गोपनीयता धोरण

तुमची गोपनीयता आमची प्राथमिकता आहे. आम्ही तुमची माहिती कशी संरक्षित आणि व्यवस्थापित करतो ते जाणून घ्या.

1. 📜 प्रस्तावना

एजंटमराठा वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप्लिकेशन हा एक ऑनलाइन वैवाहिक प्लॅटफॉर्म आहे, जो योग्य जोडीदार शोधण्यासाठी सेवा प्रदान करतो.

आपण या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करताना व सेवा वापरताना आपली वैयक्तिक माहिती स्वेच्छेने प्रदान करता आणि या गोपनीयता धोरणानुसार त्या माहितीचा वापर करण्यास सहमती देता.

जर आपण या धोरणाशी सहमत नसाल, तर कृपया प्लॅटफॉर्मचा वापर करू नका.

2. 📜 कायदेशीर अनुपालन

हा प्लॅटफॉर्म भारतातील लागू डेटा संरक्षण, गोपनीयता आणि माहिती तंत्रज्ञानासंबंधी कायदे व नियमांचे पालन करून कार्यरत आहे.

वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आणि तिचा वापर लागू कायदे व नियम, प्लॅटफॉर्मचे नियम व अटी तसेच गोपनीयता धोरणानुसार करणे ही आमची महत्त्वाची जबाबदारी आहे.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान वापरकर्त्याने खालील बाबी स्पष्टपणे स्वीकारणे व संमती देणे आवश्यक आहे:

  • मी एजंटमराठाचे नियम व अटी आणि गोपनीयता धोरण वाचले असून त्यांना माझी संमती आहे.
  • मी विवाहासाठी आवश्यक किमान कायदेशीर वयोमर्यादा पूर्ण केलेली आहे (पुरुष: २१ वर्षे, महिला: १८ वर्षे).
  • नोंदणीदरम्यान माझ्याकडून दिलेली सर्व माहिती खरी, अचूक आणि अद्ययावत आहे.
  • माझी वैयक्तिक माहिती प्लॅटफॉर्मच्या सेवा देण्यासाठी, लागू कायदे व गोपनीयता धोरणानुसार संकलित, वापरली आणि आवश्यकतेनुसार प्रक्रिया केली जाऊ शकते, यास मी संमती देतो/देते.

कंपनी आपली डिजिटल सेवा सर्व वयोगटातील वापरकर्त्यांसाठी, विशेषतः वृद्ध व्यक्ती, तरुण वापरकर्ते तसेच दिव्यांग व विशेष गरजा असलेल्या व्यक्तींसाठी अधिक सुलभ, वापरण्यास सोपी आणि प्रवेशयोग्य बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.

3. 📝 आम्ही कोणती माहिती गोळा करतो

आमचा प्लॅटफॉर्म दोन टप्प्यांमध्ये माहिती गोळा करतो:

  • (A) नोंदणी
  • (B) प्रोफाइल पूर्ण

📌 (A) नोंदणीवेळी गोळा होणारी माहिती

🔹 वैयक्तिक माहिती

  • स्वतःचे नाव व आडनाव
  • लिंग
  • जन्मतारीख
  • राज्य, जिल्हा, तालुका
  • मराठा उपवर्ग

🔹 वैवाहिक व इतर माहिती

  • वैवाहिक स्थिती
  • चष्मा वापरता का
  • रक्तगट
  • आहाराची पसंती
  • भाषा

🔹 संपर्क माहिती

  • ईमेल पत्ता
  • व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक / संपर्क क्रमांक
  • पासवर्ड (एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवला जातो)

📌 (B) प्रोफाइल पूर्ण करताना गोळा होणारी माहिती

नोंदणीनंतर वापरकर्ता सविस्तर प्रोफाइल तयार करतो.

🔹 वैयक्तिक माहिती:

  • पूर्ण नाव (स्वतःचे, वडिलांचे, आडनाव)
  • स्थायी पत्ता (घर क्रमांक / इमारत नाव / गल्ली / सोसायटी,गाव / शहराचे नाव,पिनकोड )
  • उंची, वजन, वर्ण, शारीरिक स्थिती, धार्मिकता

🔹 जन्म व ज्योतिष माहिती:

  • जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म दिवस
  • जन्मस्थान
  • राशी, नक्षत्र, चरण, नाडी, गोत्र / देवक ,मंगळ दोष, गण,पत्रिका जुळणे अट
  • कुलदैवत, नावरस नाव

🔹 कौटुंबिक माहिती:

  • वडिलांचे नाव व व्यवसाय
  • आईचे नाव व व्यवसाय
  • भाऊ / बहिणी माहिती
  • कुटुंब प्रकार व संख्या
  • पाहुणे (आडनावे)

🔹 शैक्षणिक माहिती:

  • शिक्षण
  • विद्यापीठ / संस्था

🔹 नोकरी / व्यवसाय माहिती:

  • नोकरी/व्यवसाय
  • कंपनीचे नाव ,कामाचे स्थान ,नोकरीची विविधता ,पदनाम, नोकरीचा प्रकार,वेतन,सुट्टीचा दिवस, EPF/ESIC लाभ
  • व्यवसायाचे नाव ,व्यवसायाचे स्थान,मासिक उत्पन्न,सुट्टीचा दिवस

🔹 शेती व मालमत्ता (पर्यायी / मर्यादित वापर)

  • शेती व क्षेत्र
  • घर व क्षेत्रफळ
  • वाहने
  • परदेशात स्थायिक स्थिती,घरजावई राहण्यास तयार

🔹 अतिरिक्त माहिती (पर्यायी / मर्यादित वापर)

  • घरजावई हवा आहे ,शहरी/ग्रामीण प्राधान्य,इच्छित ठिकाण
  • लग्नानंतर नोकरी/शिक्षण
  • स्वयंपाक, जीवनशैली(पेहराव)

🔹 इतर माहिती:

  • इच्छा/अपेक्षा
  • सोशल मीडिया माहिती (फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम)
  • व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक / संपर्क क्रमांक

🔹 अपलोड केलेली माहिती

  • प्रोफाइल फोटो (मर्यादित संख्या)
  • बायोडाटा फोटो
  • व्हिडिओ (पर्यायी / मर्यादित वापर)

काही माहिती प्रोफाइल प्रकारानुसार (पुरुष/महिला) वेगळी दिसू शकते, जे फक्त वापरकर्ता अनुभव आणि मॅचिंग सुधारण्यासाठी आहे.

घर/निवासस्थानाचा व्हिडिओ प्रोफाइलमध्ये दिलेल्या माहितीची पूर्तता व स्थळाबाबत अधिक स्पष्टता प्रदान करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ही सुविधा निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाते आणि प्लॅटफॉर्मच्या सुरक्षा व कंटेंट मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियंत्रित केली जाते. व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत नियम व प्रणाली-निर्धारित निकषांनुसार मर्यादित असते.

वापरकर्त्याद्वारे अपलोड केलेल्या सर्व फोटो, व्हिडिओ व इतर सामग्रीवरील मालकी हक्क संबंधित वापरकर्त्याकडेच राहतील. तथापि, सेवा देण्यासाठी त्या सामग्रीचा वापर करण्याचा मर्यादित आणि एकट्याचा नसलेला अधिकार कंपनीकडे राहील. ही सामग्री विक्री, गैरवापर किंवा तृतीय पक्षांना दिली जाणार नाही.

वापरकर्त्याची माहिती खालील गटांमध्ये वर्गीकृत करून गोळा केली जाते, जेणेकरून माहिती स्पष्ट, सुसंगत आणि सहज समजण्याजोगी राहील. प्रत्येक गटातील माहिती प्रोफाइल व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागांमध्ये दर्शविली जाते.

4. ⚠️ संवेदनशील माहिती

खालील माहिती संवेदनशील मानली जाते:

  • जात व धर्म
  • ज्योतिष माहिती
  • उत्पन्न व आर्थिक माहिती

ही माहिती वापरकर्ता स्वेच्छेने प्रदान करतो.

5. 🔄 स्वयंचलितपणे गोळा होणारी माहिती (तांत्रिक डेटा)

प्लॅटफॉर्म वापरताना खालील माहिती आपोआप गोळा होऊ शकते:

  • आयपी पत्ता (IP Address)
  • डिव्हाइस आयडी / डिव्हाइस नाव
  • ब्राउजर आणि ऑपरेटिंग सिस्टीम माहिती
  • लॉगइन वेळ आणि क्रियाकलाप लॉग्स
  • अंदाजे स्थान (शहर/राज्य)

ही माहिती सुरक्षा, विश्लेषण व सेवा सुधारण्यासाठी वापरली जाते.

हा प्लॅटफॉर्म कुकीज आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर सत्र व्यवस्थापन, लॉगिन प्रक्रिया सुलभ करणे आणि सेवा सुरळीत चालण्यासाठी करतो. कुकीज संदर्भातील अधिक माहिती स्वतंत्र धोरणामध्ये दिली आहे.

6. 📊 माहिती कशासाठी वापरली जाते

  • योग्य जोडीदार शोधण्यासाठी
  • प्रोफाइल मॅचिंग व सर्च
  • ब्रांच/अ‍ॅडमिनमार्फत सहाय्य
  • नोटिफिकेशन्स
  • फसवणूक प्रतिबंध व सुरक्षा
  • सेवा सुधारणा व प्रणाली कार्यक्षमतेसाठी

टीप: वापरकर्त्यांमध्ये थेट मेसेजिंग सुविधा उपलब्ध नाही.

वापरकर्त्याला सेवा संबंधित किंवा मार्केटिंग संदेश (ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप) प्राप्त होऊ शकतात.

अशा संदेशांबाबत कोणतेही बदल, थांबवणे किंवा प्राधान्य नियंत्रित करण्यासाठी वापरकर्त्याने सपोर्ट टीमशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

कंपनी वापरकर्त्याच्या विनंतीनुसार शक्य तेवढ्या मर्यादेत आवश्यक नियंत्रण लागू करण्याचा प्रयत्न करेल.

सध्या वापरकर्त्यांकडून अभिप्राय, सर्वेक्षण किंवा रेटिंग डेटा गोळा केला जात नाही.

भविष्यात सेवा सुधारण्यासाठी अभिप्राय, सर्वेक्षण किंवा रेटिंग प्रणाली लागू केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित माहितीचा वापर सेवा गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जाईल.

7. प्रोफाइल मॅचिंग

प्रोफाइल मॅचिंग किंवा जोडीदार सुचविण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रणाली-आधारित स्वयंचलित अल्गोरिदमचा वापर केला जाऊ शकतो. तथापि, अंतिम निर्णय वापरकर्त्याच्या निवडीवर आधारित राहील.

8. 🤝 माहिती शेअर करणे

🔹 इतर वापरकर्त्यांसोबत

प्रोफाइल माहिती इतरांना दिसू शकते.

वापरकर्त्यांची प्रोफाइल व त्यामधील उपलब्ध संपर्क माहिती ही प्लॅटफॉर्मच्या क्रेडिट-आधारित प्रवेश प्रणालीद्वारे नियंत्रित केली जाते. वापरकर्ता आवश्यक क्रेडिट्स वापरून संबंधित प्रोफाइल पाहू शकतो व प्रणालीमध्ये उपलब्ध असलेली माहिती (ज्यामध्ये सोशल मीडिया प्रोफाइल माहिती, पत्ता व इतर उपलब्ध संपर्क तपशील समाविष्ट असू शकतो) पाहण्यास सक्षम होतो. ही माहिती कोणत्याही अतिरिक्त परवानगीशिवाय, प्लॅटफॉर्मच्या निर्धारित नियम व प्रवेश मॉडेलनुसार प्रदर्शित केली जाते.

👉 संपर्क माहिती दृश्यमानता:

वापरकर्त्यांनी क्रेडिट वापरून प्रोफाइल अनलॉक केल्यानंतर, त्या प्रोफाइलमधील उपलब्ध संपर्क माहिती (मोबाइल नंबर, सोशल मीडिया, पत्ता इ.) संपूर्णपणे दर्शविली जाऊ शकते.

👉 क्रेडिट खर्च व प्रवेश कालावधी:

प्रोफाइलमधील संपर्क माहिती पाहण्यासाठी प्रत्येक प्रोफाइलसाठी निश्चित क्रेडिट्स आवश्यक असतात. प्रत्येक प्रोफाइलसाठी लागणारे क्रेडिट्स प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे दर्शविले जातील.

👉 अनलॉक प्रवेश कालावधी:

एकदा प्रोफाइल अनलॉक केल्यानंतर, त्या प्रोफाइलमधील संपर्क माहिती त्या वापरकर्त्याच्या खात्याच्या अस्तित्वापर्यंत किंवा ते हटवल्यापर्यंत उपलब्ध राहील.

वापरकर्त्याची माहिती आवश्यक असल्यास व सुरक्षिततेच्या अटींच्या अधीन राहून भारताबाहेर डेटा प्रक्रिया किंवा स्टोरेजसाठी हस्तांतरित केली जाऊ शकते, तथापि अशा ठिकाणी डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा मानके लागू केली जातील.

पेमेंट प्रक्रिया रझरपे (Razorpay) सारख्या तृतीय पक्ष पेमेंट गेटवेच्या माध्यमातून सुरक्षितपणे केली जाते. कंपनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा बँक खाते तपशील थेट साठवत नाही. सर्व आर्थिक व्यवहार संबंधित पेमेंट गेटवेच्या सुरक्षा मानकांनुसार (उदा. पीसीआय-डीएसएस / PCI-DSS) हाताळले जातात.

🔹 तृतीय पक्ष सेवा

  • पेमेंट सेवा
  • क्लाउड स्टोरेज
  • ईमेल सेवा

तृतीय पक्ष सेवांबाबत अधिक माहिती स्वतंत्र तृतीय पक्ष अटी व धोरणामध्ये उपलब्ध आहे.

हे सेवा प्रदाते तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यास बांधील असतात.

🔹 कायदेशीर कारणांसाठी

  • कायदा अंमलबजावणी संस्था
  • न्यायालयीन आदेश
  • फसवणूक तपास

9. ⚠️ माहिती अचूकतेबाबत अस्वीकरण (हमी नाही)

प्लॅटफॉर्मवर उपलब्ध माहिती ही वापरकर्त्यांनी दिलेली असते. तिच्या अचूकतेबाबत एजंटमराठा कोणतीही हमी देत नाही.

प्लॅटफॉर्मवरील अटी, मर्यादा व जबाबदारी संदर्भातील माहिती स्वतंत्र अस्वीकरण (Disclaimer) पृष्ठावर उपलब्ध आहे.

10. 👁️ प्रोफाइल दृश्यमानता (दृश्यमानता सूचना)

नोंदणी व प्रोफाइल फॉर्ममध्ये तुम्ही दिलेली माहिती प्लॅटफॉर्मवरील इतर वापरकर्त्यांना दिसू शकते. कृपया प्रोफाइलमध्ये फक्त आवश्यक आणि योग्य माहितीच भरा.

कृपया माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा.

11. 🔒 डेटा सुरक्षा

कंपनी वापरकर्त्याच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी खालील तांत्रिक व संघटनात्मक उपायांचा अवलंब करते:

  • एसएसएल / टीएलएस (SSL/TLS) एन्कोडिंग
  • पासवर्ड हॅशिंग
  • सुरक्षित सत्र व्यवस्थापन (Secure Sessions)
  • इनपुट प्रमाणीकरण (Input Validation)
  • आयपी मॉनिटरिंग व सुरक्षा ट्रॅकिंग

तथापि, इंटरनेट-आधारित प्रणाली पूर्णतः सुरक्षित असते याची कोणतीही हमी किंवा शाश्वती कंपनीकडून दिली जात नाही.

कोणत्याही संभाव्य डेटा उल्लंघन किंवा सुरक्षा घटनेच्या परिस्थितीत, कंपनी लागू कायद्यांनुसार आवश्यक त्या वापरकर्त्यांना व संबंधित प्राधिकरणांना योग्य कालावधीत सूचना देण्याचा प्रयत्न करेल.

सुरक्षा संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना स्वतंत्र सुरक्षा धोरणामध्ये उपलब्ध आहेत.

12. ✅ वापरकर्त्यांचे अधिकार

  • प्रोफाइल पाहणे.
  • लागू अटी व प्रक्रियेनुसार संबंधित प्रोफाइलची संपर्क माहिती पाहणे.
  • खाते डिलीट करणे.
  • गोपनीयता सेटिंग नियंत्रित करणे. (प्रोफाइल दृश्यमानता पातळी)
  • पसंती पाठवणे व काढणे.
  • स्वतःच्या प्रोफाइलमध्ये आवश्यक ते बदल (संपादन) करणे.
  • होकार यादी, माझी पसंती यादी व बघितलेल्या प्रोफाइल्सची यादी पाहणे.

वापरकर्त्याला त्याचा वैयक्तिक डेटा पाहण्याचा व आवश्यक ते बदल करण्याचा अधिकार आहे.

डेटा डाउनलोड किंवा इतर स्वरूपात प्राप्त करण्याची सुविधा सध्या उपलब्ध नाही.

13. 💾 डेटा साठवणूक

खाते सक्रिय असेपर्यंत डेटा साठवला जातो.

खाते हटविण्याची विनंती केल्यानंतर ७ दिवसांचा पुनर्सक्रियकरण कालावधी लागू राहतो. या कालावधीत खाते पुन्हा सक्रिय केले नाही, तर ७ दिवसांनंतर खाते कायमस्वरूपी हटविले जाईल आणि संबंधित वैयक्तिक डेटा लागू प्रक्रियेनुसार हटविला जाईल.

प्रोफाइल रिपोर्ट्ससाठी ९० दिवसांचा डेटा रिटेंशन कालावधी लागू आहे.

आयपी पत्ते ३० दिवसांनंतर वैयक्तिक ओळख पटणार नाही अशा स्वरूपात रूपांतरित केले जातात.

काही माहिती कायदेशीर बंधन, फसवणूक प्रतिबंध किंवा सुरक्षा कारणांसाठी जास्त कालावधीसाठी राखून ठेवली जाऊ शकते.

सिस्टमची अखंडता आणि सुरक्षा राखण्यासाठी सध्या वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित सर्व्हरवर साठवला जातो.

नियमित बॅकअप प्रणाली भविष्यात लागू केली जाऊ शकते, आणि अशा बॅकअप्सना मर्यादित कालावधीनंतर सुरक्षितरीत्या हटविले जाईल.

14. 👉 निष्क्रिय खाते धोरण

दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या खात्यांवर व्यवस्थापकीय निर्णयानुसार कारवाई केली जाऊ शकते. अशा खात्यांना निष्क्रिय किंवा हटविण्यापूर्वी पूर्वसूचना दिली जाईल. नियमित वापरासाठी वापरकर्त्यांनी नियमितपणे लॉग इन करणे शिफारसीय आहे.

15. 🔐 वयोमर्यादा व माहिती संपादन मर्यादा

हा प्लॅटफॉर्म विवाहासाठी पात्र असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. विवाहासाठी पुरुषाचे वय किमान २१ वर्षे आणि महिलेचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

❌ (A) नोंदणीनंतर बदलता न येणारी माहिती

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर खालील माहिती प्रणालीच्या सुरक्षा, ओळख पडताळणी आणि डेटा अचूकतेच्या कारणास्तव लॉक (स्थिर) केली जाते, आणि ती वापरकर्त्याला थेट बदलणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसते:

  • लिंग
  • जन्मतारीख
  • मराठा उपवर्ग
  • वैवाहिक स्थिती

तथापि, अशा माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती आवश्यक असल्यास, वापरकर्ता कंपनीच्या अधिकृत सपोर्ट/शाखा माध्यमातून योग्य कागदपत्रांसह पडताळणी करून बदलाची विनंती करू शकतो. अंतिम निर्णय कंपनीच्या धोरण व लागू प्रक्रियेनुसार घेतला जाईल.

🔐 (B) प्रोफाइल पूर्ण करताना लॉक होणारी माहिती

प्रोफाइल पूर्ण करताना वापरकर्त्याने भरलेली काही माहिती सेव्ह केल्यानंतर प्रणालीमध्ये डेटा सुसंगतता व फसवणूक प्रतिबंधाच्या उद्देशाने लॉक केली जाऊ शकते.

यामध्ये खालील माहिती समाविष्ट असू शकते उदाहरणार्थ (परंतु यापुरते मर्यादित नाही):

  • जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म दिवस, जन्मस्थान
  • राशी, नक्षत्र, चरण, नाडी ,गोत्र / देवक, मंगळ दोष, गण,पत्रिका जुळवण्याची अट,कुलदैवत, नावरस नाव
  • नोकरी/व्यवसाय कंपनीचे नाव ,कामाचे स्थान ,नोकरीची विविधता ,पदनाम, नोकरीचा प्रकार,वेतन,सुट्टीचा दिवस, ईपीएफ/ईएसआयसी (EPF/ESIC) लाभ
  • व्यवसायाचे नाव ,व्यवसायाचे स्थान,मासिक उत्पन्न,सुट्टीचा दिवस

ही माहिती सामान्य परिस्थितीत वापरकर्त्याला थेट बदलणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसते.

अशा माहितीतील कोणताही बदल किंवा दुरुस्ती फक्त अधिकृत पडताळणी प्रक्रियेनंतर कंपनीच्या मंजुरीनेच केली जाईल. (अंतिम निर्णय कंपनीच्या धोरण व लागू प्रक्रियेनुसार घेतला जाईल.)

🔒 (C) लॉक चिन्ह असलेली माहिती

ज्या माहितीसमोर 🔒 हे चिन्ह दर्शविलेले असेल, ती माहिती सिस्टम-नियंत्रित (system-locked) असून वापरकर्त्याद्वारे थेट बदलणे किंवा दुरुस्ती करणे शक्य नसते.

अशा माहितीमध्ये बदल करण्यासाठी वापरकर्त्याने कंपनीच्या सपोर्ट/शाखेकडे योग्य कारण व आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून विनंती सादर करणे आवश्यक आहे.

⚠️ सूचना

चुकीची, दिशाभूल करणारी किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास, आवश्यक ती पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून आणि योग्य पूर्वसूचना देऊन, कंपनीला संबंधित खाते तात्पुरते निलंबित करण्याचा किंवा कायमस्वरूपी हटविण्याचा अधिकार राहील.

16. 🔍 बनावट प्रोफाइल हाताळणी (बनावट प्रोफाइल हाताळणी)

कंपनी बनावट, दिशाभूल करणारे किंवा संशयास्पद प्रोफाइल ओळखण्यासाठी व त्यावर कारवाई करण्यासाठी आवश्यक प्रणाली व प्रक्रिया वापरते. अशा प्रोफाइल्सवर तपासणी करून त्यांना निलंबित किंवा कायमस्वरूपी हटविण्यात येऊ शकते.

वापरकर्त्यांना संशयास्पद किंवा अनुचित प्रोफाइल रिपोर्ट करण्याचा अधिकार आहे. तसेच, आवश्यक असल्यास काही प्रोफाइल्सपासून दूर राहण्यासाठी किंवा संपर्क टाळण्यासाठी प्रणाली-आधारित मर्यादा लागू केल्या जाऊ शकतात.

17. 🔗 बाह्य दुवे (External Links)

प्लॅटफॉर्मवर तृतीय पक्ष (फेसबुक, इन्स्टाग्राम इ.) लिंक असू शकतात.

त्या वेबसाइटच्या गोपनीयता धोरणासाठी आम्ही जबाबदार नाही. वापरकर्त्याने त्या वेबसाइटच्या अटी स्वतंत्रपणे तपासाव्यात.

18. ⚠️ फसवणूक व सुरक्षा सूचना

  • बनावट प्रोफाइल असण्याची शक्यता असते
  • आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या
  • संशयास्पद प्रोफाइल रिपोर्ट करा

जबाबदारी मर्यादा (जबाबदारी संरक्षण): वापरकर्त्यांमधील कोणतेही संवाद, निर्णय किंवा व्यवहार हे पूर्णपणे त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवर आधारित असतील. एजंटमराठा अशा कोणत्याही परिणामांसाठी जबाबदार राहणार नाही.

19. 🔄 धोरणातील बदल

आम्ही या धोरणात कोणत्याही वेळी बदल करण्याचा अधिकार राखून ठेवतो.

आगाऊ सूचना न देता धोरणामध्ये बदल किंवा अपडेट केले जाऊ शकतात.

बदल प्रकाशित होताच ते तात्काळ प्रभावी होतील.

सर्व अपडेट्स वेबसाइटवर प्रसिद्ध केले जातील.

वापरकर्त्यांनी धोरण वेळोवेळी तपासणे ही त्यांची जबाबदारी असेल.

धोरण बदलांवर अंतिम अधिकार एजंटमराठा कडे राखीव आहेत.

20. ⚠️ अंतिम सूचना

  • वापरकर्ते स्वतःच्या जबाबदारीवर माहिती देतात
  • प्लॅटफॉर्म सर्व माहिती पडताळत नाही
  • कृपया सावधगिरी बाळगा

📞 संपर्क आणि मदत (सहाय्य)

गोपनीयता धोरणाबद्दल कोणत्याही प्रश्नांसाठी:

  • 📧 ईमेल:  info@agentmaratha.com
  • 📞 फोन: +91-9112353629
  • व्हॉट्सअ‍ॅप: +91-9112353629
  • 🌐 संपर्क फॉर्म: येथे क्लिक करा
  • ⚖️ तक्रार निवारण अधिकारी:  info@agentmaratha.com

⏰ सोमवार ते शनिवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 7

कंपनी लागू कायद्यानुसार आवश्यक असल्यास डेटा संरक्षण अधिकारी (डीपीओ / DPO) नेमू शकते. सध्या डेटा व्यवस्थापन व गोपनीयता अनुपालनाची जबाबदारी नियुक्त तक्रार निवारण अधिकारी (तक्रार निवारण अधिकारी) मार्फत हाताळली जाते.

शेवटचे अपडेट: September 13, 2026

आमच्याशी संपर्क साधा

गोपनीयता धोरणाबद्दल कोणत्याही प्रश्नासाठी किंवा मदतीसाठी आमच्याशी संपर्क करा

संपर्क करा